*कोंकण एक्सप्रेस*
*बांबर्डे येथे सर्पमित्र लाडू गवस यांनी 12 फुटी किंग कोब्रा नागास केले रेस्क्यू*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग तालूक्यातील हेवाळे बांबर्डे येथील बागायतीत रविवारी रात्री सर्पमित्र लाडू गवस यांनी 12 फुटी किंग कोब्रा नागास रेस्क्यू केले.रात्री उशिरा वन अधिकारी यांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
त्यावेळी त्या ठिकाणी सावंतवाडी उपवसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, व दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, कोनाळ वनपाल किशोर जंगले ही उपस्थित होते. यावेळी त्याच्यासोबत हेवाळे बांबर्डे वनरक्षक शुभम वारके, वनरक्षक घोडगेवाडी वनरक्षक मयुरेश करगुटकर, तपासणी वनरक्षक नाका कोनाळ छाया लोहार, मदतनीस कोनाळ नितेश देसाई, विकास गवाळकर वाहन चालक संतोष शेटकर उपस्थित होते.

