*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे होणार पालकमंत्री ; कोकणात सर्वत्र चर्चेला उधाण*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
नागपूर येथे राजभवनातील शपथग्रहण सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्रिपदाची कणकवली विधानसभा मतदारसंघाचे हिंदुरक्षक आमदार नितेश राणे यांनी शपथ घेतली. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे होणार असल्याची सर्वञ कोकणात जोरदार चर्चा सुरू आहे.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, भाजपाचे पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांचे मंत्री नितेश राणे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.
हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य व माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार आहे अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे होणार आहे अशी जोरदार चर्चा कोकणात होत आहे.

