*कोंकण एक्सप्रेस*
*पोलीस पाटील दिनानिमित्त उद्या पोलीस पाटील स्नेह मेळावा*
*सावंतवाडी: प्रतिनिधी*
उद्या मंगळवारी 17 डिसेंबर रोजी पोलीस पाटील दिनानिमित्त सावंतवाडी प्रांत विभाग पोलीस पाटील संघटनेच्या वतीने नरेंद्र सृष्टी मळगाव ब्राह्मण पाट,सावंतवाडी येथे सावंतवाडी,वेंगुर्ला,दोडामार्ग या तिन्ही तालुक्यातील पोलीस पाटील यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर, निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस, माजी नगराध्यक्ष सच्चीदानंदा उर्फ संजू भाई परब, प्रांत साहेब निकम साहेब, तहसीलदार पाटील साहेब, माजी सभापती प्रमोद भाई कामत, मळगाव प्रभारी सरपंच हनुमंत पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांस मोठ्या संख्येने पोलीस पाटील यांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन प्रांत विभाग संघटना अध्यक्ष जागृती गावडे, तालुकाध्यक्ष तानाजी सावंत उपाध्यक्ष नितीन नाईक आणि सावंतवाडी पोलीस पाटील संघटना यांच्याकडून करण्यात आले आहे.

