*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट महाविद्यालयातील नीता धुरी या विद्यार्थीनीच्या संशोधन प्रकल्पाची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड*
*कणकवली : प्रतिनिधी*
मुंबई विद्यापीठ मुंबई आयोजित 19 वी आविष्कार आंतर – महाविद्यालयीन संशोधन प्रकल्प अहवाल सादरीकरण स्पर्धा स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे संपन्न झाली.”कणकवली तालुक्यातील मनरेगा योजनेतील लाभार्थ्यांचा अभ्यास” या विषयावर डॉ.बालाजी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडाघाट महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला मधील विद्यार्थीनी नीता धुरी हिने सादर केलेल्या संशोधन प्रकल्पाची दिनांक 17 डिसेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
याबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. महेश सावंत, सचिव श्री.चंद्रशेखर लिंग्रस,खजिनदार श्री.विठोबा तायशेटे संस्थेचे सर्व संचालक,सीडीसी चे सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरंधर नारे,महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व ग्रामस्थ यांचेकडून नीता धुरी हिचे अभिनंदन करण्यात येत आहे.