*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भारतरत्न ,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रणेते ,लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
चाणक्यानंतर ,भारताला एकसंध करण्यासाठी जर कोणी महापुरुषाने कोणतेही महत्वपूर्ण कार्य केले असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते.त्यामुळेच आज काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आपण भारत मातेचे स्मरण एकाच स्वरात करतो . देशाचे अखंडत्व राखण्यात सरदार साहेबांचा मोठा वाटा होता.त्यांनी आपल्याला एकसंध भारत दिला.आता श्रेष्ठ भारत घडवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिला आहे.एकसंध भारत श्रेष्ठ भारत होण्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक प्रयत्न करुया असे प्रतिपादन शरद चव्हाण यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहीर देसाई,ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर,जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस,सरपंच संघटनेचे पपु परब,ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शक्तिकेंद्र प्रमुख – मयुरेश शिरोडकर,नाथा मडवळ – नितीन परब – कमलेश गावडे – जगंन्नाथ राणे,खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , आसोली उपसरपंच संकेत धुरी,होडावडा उपसरपंच राजबा सावंत,अमित गावडे,राहुल गावडे,दाजी परब,नितीन चव्हाण , संजु प्रभु,सिद्धेश सावंत,संदिप देसाई,अनंत केळजी,ओंकार चव्हाण तसेच इतर अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .