*कोंकण एक्सप्रेस*
*कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत २२ डिसेंबरला भव्य सत्कार सोहळा*
*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती*
*कणकवली : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री नितेश राणे ह। २२ डिसेंबरला सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत.त्यांचे कणकवलीत भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
२२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता कणकवली पटवर्धन चौकात कणकवली शहर व तालुका भाजपाच्या वतीने भव्य स्वागत व तिथून रॅली काढून कणकवली मतदार संघाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर साडे सहा वाजता भव्य नागरी सत्कार सोहळा देखील करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नागरिकांना राज्याचे मंत्री नितेश राणे यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी संध्याकाळी ६.३० वाजता या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केले आहे. समीर नलावडे व गोट्या सावंत यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून न भूतो न भविष्यती असा हा सत्कार सोहळा होणार आहे.