*कोंकण एक्सप्रेस*
*नितेश राणेंनी शपथ घेतल्यानंतर सावंतवाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून फटाके वाजवून तसेच मिठाई वाटून जोरदार जल्लोष करण्यात आला.येथील मोती तलावाच्या काठावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावले,माजी नगरसेवक गुरू मठकर, आनंद नेवगी,उदय नाईक,साईनाथ जामदार,संतोष मठकर,ओंकार सावंत,श्री.पाटकर आदी उपस्थित होते.

