*कोकण Express*
*पंढरपूर शहरासह १० गावांत संचारबंदी, दिंड्या, पालख्यांनाही प्रवेश बंद, माघ वारी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*
▪️माघी एकादशीचा मुख्य सोहळा 23 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. यामुळे पंढरीत माघ यात्रेला भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून दि. 22 रोजी रात्री 12 ते दि. 23 रोजी रात्री 12 पर्यंत पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात संचारबंदी आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर दिंड्या, पालख्यांना पंढरपूर प्रवेशही बंद केला आहे.