*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार नितेश राणेंनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ*
*कणकवली : प्रतिनिधी*
महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात आमदार नितेशजी राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज नागपूर विधानभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात महामहिम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या हस्ते मंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुत्वाचे विचार आणखी भक्कम करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व माझ्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार असल्याचे नितेशजी राणे म्हणाले.
यावेळी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माजी मुख्यमंत्री खासदार श्री. नारायणराव राणे, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.