*कोंकण एक्सप्रेस*
*मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची मा.आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत १६ डिसेंबरला मुंबई शिवसेना भवन येथे बैठक*
*बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन*
*मालवण : प्रतिनिधी*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, चाकरमानी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई,ठाणे,कल्याण,विरार,वसई व मुंबईच्या इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी पंढरी तावडे – ९३२२९०९२७७,यांच्याशी संपर्क साधावा.