निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन फुटून १५ दिवस उलटले तरी अद्यापही दुरुस्ती नाही – माजी उपसरपंच गुरूदास गवंडे

निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन फुटून १५ दिवस उलटले तरी अद्यापही दुरुस्ती नाही – माजी उपसरपंच गुरूदास गवंडे

*कोंकण एक्सप्रेस*

*निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन फुटून १५ दिवस उलटले तरी अद्यापही दुरुस्ती नाही – माजी उपसरपंच गुरूदास गवंडे*

*बांदा : प्रतिनिधी*

निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन गेले १०-१५ दिवस झाले फुटून यासंदर्भात निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सरपंच /ग्रामपंचायत अधिकारी यांना पत्रव्यवहार केला. परंतु काल दुरुस्तीसाठी ती घेतली असता पाईप दुसरीकडे आणि खोदकाम तिसरीकडे अशी परिस्थिती निगुडे ग्रामपंचायतीची झालेली आहे. निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव उद्या असून अनेक चाकरमानी, गावात आले असता पाण्याचा तुटवडा झाला आहे. गावातील नागरिक पाणी नसल्यामुळे हैराण झालेले आहे दिनांक ०९ डिसेंबर रोजी गुरुदास गवंडे यांनी ग्रामपंचायतीला सदर पाईपलाईन दुरुस्ती करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. त्याची दखल घेऊन काल चार दिवसांनी पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला परंतु ही लाईन गेले १०-१५ दिवस झाले फुटून यासंदर्भात ग्रामपंचायतीला काही लेणं देणं नाही. एकतर नळ योजनेचे युनिट दर हे प्रति ९ रुपये करण्यात आले आहे असं असतानाही गावात जर मुबलक पाणीपुरवठा लोकांना मिळू शकत नाही तरी नळयोजना काय उपयोगाची त्यामुळे सरपंच, उपसरपंच हे या सर्व गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम्ही वारंवार यासंदर्भात ग्रामसभेत आवाज ही उठवला आहे परंतु ग्रामसभेत काही गोष्टींचे अंमलबजावणी होत नाही पाईप का फुटतात हे ग्रामसभेमध्ये सांगूनही त्या ठिकाणी एअरवॉल बसवण्यास ग्रामपंचायत प्रशासन दिरंगाई का करत आहे? त्यामुळे या ठिकाणी असणारे पंचायत समितीमध्ये प्रशासक हे पूर्णतः ग्रामपंचायतीच्या कारभारावर दुर्लक्ष करीत असल्यामुळे या ठिकाणी असणारे त्यांचे सचिव ग्रामपंचायत अधिकारी हे पण त्याच पद्धतीने मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही गुरुदास गवंडे यांनी केलेला आहे जर पिण्याचे पाण्याची व्यवस्था सरपंच, उपसरपंच करू शकत नाही तर प्रत्येक वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करा असा इशाराही गुरुदास गवंडे यांनी दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!