*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत काॅंग्रेसतर्फे ईव्हीएम हटाव देश बचाव मोहीमेसाठी सह्यांची मोहीम*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुका काँग्रेस पक्षातर्फे आज ईव्हीएम हटाव देश बचाव मोहीमे साठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप व निवडणूक आयोग यांनी मशीन मधे फेरफार करुन विजय मिळविला .त्यामुळे लोकांच्या मनात ईव्हीएम बद्दल कमालीचा रोष आहे. त्यामुळेच तालुक्यातून 3000 सह्या गोळा करुन त्या पक्षामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहेत व ईथून पुढच्या निवडणूका या बॅलेट पेपर वर घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस बाळू मेस्त्री, प्रवीण वरुणकर शहर अध्यक्ष अजय मोरये, तालुका सरचिटणीस महेश तेली, संजय राणे, प्रदीपकुमार जाधव, संतोष टक्के राजेंद्र वर्णे, दत्तात्रय रेवडेकर, आयेशा सय्यद, निलेश मालंडकर, संजय सावंत, संदीप कदम, नादीरशा पटेल अमित मांडवकर, महादेव दहीबावकर, देवेंद्र दहीबावकर, संजय सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

