कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कळसुली येथील श्री. स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न*

*भाविकांचा लोटला जनसागर ;मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई*

*कणकवली : प्रतिनिधी*

‘दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’ श्री.स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ,दत्त गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ,दत्ता दिगंबरा या ओ, स्वामी मला भेट द्या ओ च्या अखंड जयघोषात व भाविकांच्या उत्साहात कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात शनिवारी दत्तजयंती भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

पहाटे चार वाजता काकड आरती, सकाळी नित्यपूजा, अभिषेक, सकाळी सत्य दत्त पूजा, दुपारी नामस्मरण, महाआरती, दुपारी १ वा.महाप्रसाद, स्थानिकांची भजने, ग्रंथ वाचन, सायं. ६ वाजता दत्त जन्म सोहळा, पालखी, रात्री.७ वा हरिपाठ, निवृत्ती मेस्त्री यांचे कीर्तन आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

दुपारच्या सत्रात महाप्रसादाचा भाविकांची लाभ घेतला.या भव्य सोहळ्यासाठी मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षी या दत्तजयंती उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांसह गोवा, मुंबई आणि कोल्हापूर येथील दत्त भक्तांनी आणि भाविकांनी ही मोठया संख्येने हजेरी लावली होती.

संध्याकाळी सहा वाजता ‘श्रीं’ च्या पाळण्यावर भाविकांनी अबीर-गुलाल व फुलांची उधळण केली.प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष श्री.हनुमंत सावंत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करुन श्री.दत्त जयंती सोहळा संपन्न केला.यावेळी श्री.स्वामी समर्थ मठ आणि कळसुली गाव श्री.दत्त नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!