*कोंकण एक्सप्रेस*
*माणगांव येथे दत्तजयंती सोहळ्याला भाविकांचा महापुर*
*माणगांव प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथिल प्रसिद्ध श्री दत्तमंदिरात श्री देव दत्तात्रयाच्या जन्मसोहळ्यासाठी भाविकांचा महापुर लोटला होता. दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्रीदत्त
क्षेत्र माणगांव येथे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. यानिमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
दुपारच्या सत्रात महाप्रसादाचा भाविकांची लाभ घेतला.या भव्य सोहळ्यासाठी मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षी या दत्तजयंती
उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
हजारो भाविकांसह गोवा, मुंबई आणि कोल्हापूर याठिकाणचे भाविकही मोठया संख्येने हजेरी लावतात.
श्री क्षेत्र माणगावच्या देवस्थानच्या मंडळाच्या वतीने या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना श्री दत्तात्रयाचे मनोभाव दर्शन करता यावे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.हजारों भाविकांनी दत्तजन्म सोहळ्याचा आस्वाद घेत मनोभावे दर्शन घेतले.सायंकाळी श्री दत्तजन्मसोहळ्यानंतर महाआरती करण्यात येणार आहे . महाआरतीनंतर श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे या पालखी सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच रात्रौ उशिरा भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे