*कोंकण एक्सप्रेस*
*पुणे न्यूज एक्सप्रेस चा “आदर्श पत्रकारिता” पुरस्कार डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज चे संपादक प्रमोद गवस यांना प्रदान*
*पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम सभागृहात झाला सोहळा*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या पत्रकारितेने एक वेगळा ठसा उटवणारे युवा पत्रकार प्रमोद गवस यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदान बाबत पुणे येथील राष्ट्रीय वृत्तवाहिनी पुणे न्यूज एक्सप्रेस चा “आदर्श पत्रकारिता” हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता.सदरचा पुरस्कार दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी माजी नगरसेवक व मुस्लिम को ऑप बँकेचे ज्येष्ट संचालक अय्युब शेख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे मुस्लिम को ऑप बँकेचे संचालक व रिकव्हरी कमिटीची चेअरमन मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद ,ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अंसारी, पुणे न्युज एक्सप्रेसचे मेहबूब सर्जेरखान,डॉ.तुषार निखळजे लेखक, साहित्यिक (पुणे ),मा.फिरोज मुल्ला सर पत्रकार,समाजसेवक मा. खंडू इंगळे कार्यकारी संपादक दैनिक कर्मयोगी कराड,मा.औरंगाबाद युवा चे संपादक मा.अब्दुल कय्युम अब्दुल रशीद औरंगाबाद ,मा.सौ.प्रमोदीनी मारुती माने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद गवस यांचे पत्रकारीतेतील कार्य उल्लेखनीय असून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली आहे. अनेक दुरितांना आधार मिळवून देण्याचे काम सुद्धा त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले आहे याचीच नोंद घेऊन सदर पुणे न्यूज एक्सप्रेस ने त्यांचा ‘आदर्श पत्रकारिता’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

