*कोंकण Express*
*पंचम खेमराजच्या तुकाराम तायशेटेची किक बॉक्सिंग स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
येथील श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तुकाराम तायशेटे याने जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोंसले, संस्थेच्या चेअरमन सौ. शुभदादेवी भोंसले तसेच पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

