*कोकण Express*
*अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह माजी संचालकांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा*
▪️रिझर्व बँक आणि नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे चौकशीच्या फेर्यात अडकलेल्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाला एसआयटीपाठोपाठ आता निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीनेही क्लीनचिट दिल्यामुळे अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील 65 नेत्यांचा राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामध्ये अजित पवार यांच्यासह विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, राजन तेली, विजयसिंह मोहिते पाटील, यशवंतराव गडाख, अमरसिंह पंडित यांचा समावेश आहे. तसेच राज्य बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी भविष्यात कोणतीही चौकशी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.