*कोंकण Express*
*रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत व्हावा – माजी आम.प्रमोद जठार यांची मागणी*
*शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
कोकणात प्रकल्प व्हायलाच हवेत.रोजगार निर्माण व्हायला हवा.त्यादृष्टीने रिफायनरी प्रकल्पाला चालना देण्याचं काम आम्ही करणार.रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत व्हावा अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली.रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आमदार रवींद्र चव्हाण हे देखील यासाठी पुढाकार घेतील आणि कोकणातले सर्व आमदार यासाठी एकत्र येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोकण सुद्धा विकासाच्या दिशेने धावणार असून कोकणातल्या दीड लाख मुलांना रोजगार या माध्यमातून मिळणार आहे.पर्यावरणाची पूर्ण काळजी घेऊन रिफायनरी प्रकल्प करण्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे.त्यासाठी Uro 6 या टेक्नॉलॉजीचा वापर व्हावा अशी आमची मागणी आहे.ज्यांच्या जमिनी आहेत अशा आमच्या बांधवांना घेऊनच अधिवेशनात बैठकीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.ज्यांच्या जागा जात आहेत अशा शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असून राजापुरातच हा प्रकल्प व्हावा अशी आमची मागणी राहिली असं जठार म्हणाले.

