कॅन्सर ग्रस्त राजेंद्र चव्हाण यांना मदतीसाठी सरसावले हात

कॅन्सर ग्रस्त राजेंद्र चव्हाण यांना मदतीसाठी सरसावले हात

*कोंकण Express*

*कॅन्सर ग्रस्त राजेंद्र चव्हाण यांना मदतीसाठी सरसावले हात*

*कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांनी आर्थिक मदत करुन जपली माणुसकी*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली येथील राजेंद्र सावळाराम चव्हाण वय वर्षे 49 या हातावरचे पोट असणा-या मजूर कामगारास काही दिवसापुर्वी तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते.आधीच राजेंद्र चव्हाण यांची घरची परिस्थिती हलाखीची असुन घरात स्वत: एकटे कमवते असुन मोलमजुरीची कामे करुन आपला आर्थिक उदरनिर्वाह करीत असत.त्यातचं काही दिवसापुर्वी त्यांना तोंडाच्या कॅन्सरचे निदान झाले.

घरची परिस्थिती नसताना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासणे हे त्यांच्यासाठी खुपच वेदनादायी आहे कॅन्सर वरील शस्त्रक्रिया व पुढील उपचारांचा खर्च या काळजीत असतानाच राजेंद्र चव्हाण हे आजारी असल्याचे नवीन कुर्ली गावात समजताच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी व नवदुर्गा युवा मंडळाचे पदाधिकारी यांनी तात्काळ ही बाब माजी सभापती मनोज रावराणे यांच्या कानावर घातली.मनोज रावराणे यांनी तात्काळ १०.०००/- रुपये रोख रक्कम व त्यांच्यावर कॅन्सर ची शस्स्त्रक्रिया करण्याकरीता वैद्यकिय डॉक्टरांशी सतत संपर्क ठेवुन सहकार्य केले.

राजेंद्र चव्हाण यांना आर्थिक मदत करतेवेळी स्वत: कणकवली माजी सभापती मनोज रावराणे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते सचिव धीरज हुंबे सदस्य कृष्णा परब, बाळकृष्ण चव्हाण, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, खजिनदार अमित दळवी, सचिव अतुल डऊर,शिवाजी चव्हाण,अलंकार रावराणे आदी तसेच राजेंद्र चव्हाण यांच्या पत्नी व मुलगा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!