सकाळचे बातमी अपडेट / २० February शनिवार

सकाळचे बातमी अपडेट / २० February शनिवार

*कोकण Express*

*सकाळचे बातमी अपडेट / २० February शनिवार*

▪️ मागील तीन चार दिवसाचा पाउसानंतर , राज्यात आजपासून हवामान कोरडे होईल , मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत काही अंशी ढगाळ वातावरण राहील

▪️ पुणे जिल्ह्यात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली , त्यानुसार जर पहिल्यांदा एखादा व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास 500 रुपये दंड करण्यात येईल.

▪️ त्यानंतर पुन्हा तोच व्यक्ती जर मास्क न घालता आढळला, तर त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.

▪️ एअरटेलने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे , त्यानुसार ग्राहकांना 6 जीबी डेटा कूपन मोफत मिळणार आहे – मात्र त्यासाठी एअरटेल थँक्स अॅपद्वारे किमान 291 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल

▪️ वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोराेनाची साखळी तोडण्यासाठी आज शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून – ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

▪️ राज्य सरकार विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवत आहे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

▪️ सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य करायला हवीत , तसेच स्वयंपाकाच्या गॅसवर सब्सिडी देण्याऐवजी विजेवर चालणारे उपकरणे घेण्यास मदत करावी – रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचे विधान

▪️ पेट्रोल डिझेलची दरवाढ अजून पण सुरूच आहे , आज शनिवारी सुद्धा पेट्रोल डिझेल 34 ते 39 पैशांनी महाग झालं आहे

▪️ *आज शनिवारी सकाळी* – पेट्रोल 97 रुपये प्रति लिटर , तर डिझेल 88.06 रुपये प्रति लिटर झाले आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!