*कोंकण Express*
*कणकवली बांदकरवाडी येथील श्री दत्त मंदिरात ११ डिसेंबर पासून दत्तजयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली बांधकरवाडी श्री दत्तमंदिर येथे श्री दत्तजन्मोत्सवानिमित्त ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त बुधवार ११ ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत दररोज स.५.३० वा. काकड आरती, शनिवार १४ रोजी सायं ४ वा. हरिपाठ, सायं. ७ वा. श्रींची पाद्यपूजा, सायं.७ वा.भजने, रात्री ११ वा. कीर्तन, रात्रौ १२ वा.श्री दत्तजन्म सोहळा व तिर्थप्रसाद त्यानंतर श्री भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल यांचे दशावतारी नाटक, रविवार १५ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री दत्त प्रसादिक मंडळ- बांधकरवाडी यांनी केले आहे.