*कोंकण Express*
*भाजप सभासद नोंदणीचे अभियान सुरू : जिल्ह्यात तीन लाख सभासद नोंदणी करणार*
*जिल्हा संयोजक समिती अध्यक्ष रणजित देसाई*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
लोकसभा आणि विधानसभा विजयानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा दमाने कामाला लागला आहे. या पक्षाने संघटना वाढीसाठी सभासद नोंदणीचे अभियान हाती घेतले आहे. भाजपच्या नवीन सभासद नोंदणीसाठी टोल फ्री नंबर देण्यात आला असून यावर मिस कॉल देताच सभासद नोंदणीची लिंक प्राप्त होणार आहे. त्यावर आपली माहिती भरून भाजप सभासद होता येणार आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक लाख मतदारांची मिळून जिल्ह्यात तीन लाख नवीन सभासद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समितीचे संयोजक तथा भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे आधी उपस्थित होते.
दरम्यान भाजपच्या या सदस्य नोंदणी अभियाना करता भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हास्तरीय समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी असलेले सहसंयोजक म्हणून महेश सारंग, संदीप साटम, श्वेता कोरगावकर, संदीप मेस्त्री, केशव नवाते यांचा समावेश आहे. जिल्हास्तराप्रमाणे जिल्ह्यातील १४ मंडळ स्तरावर मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून भाजपचे सदस्य नोंदणी होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला ८०हजार ते ८५ हजार प्रत्येक मतदारसंघात मतदान झाले आहे. या तिन्ही मतदारसंघात भाजपचे नवीन सदस्य व्हावेत या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे मानले जात आहे. यासाठी जिल्हास्तरीय व मंडळ स्तरीय भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका संपर्क मेळावे सुरू झाले आहेत. भाजपच्या विविध सेल सदस्य नोंदणीसाठी कार्यरत झाले आहे माहिती ही रणजित देसाई यांनी दिली.
*मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या!*
८८००००२०२४ या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर भाजप सभासद नोंदणीची एक लिंक प्राप्त होणार आहे. अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदाराला भाजपचा सदस्य होता येणार आहे. मोबाईलवर प्राप्त झालेल्या लिंक वर आपले माहिती भरून आपला भाजप सभासद नोंदणी क्रमांक मिळविता येणार आहे. तरी जास्तीत जास्त मतदारांनी भाजपच्या सभासद व्हावे असे आवाहन रणजीत देसाई यांनी केले आहे.

