*कोंकण Express*
*खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नशाबंदी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त अभियान मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे संपन्न झाली. याप्रसंगी नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग विभागाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुंबरकर या गेली २० वर्ष कणकवली येथील गोपुरी आश्रम यांच्या माध्यमातून अविरत नशाबंदी कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. सध्याच्या तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता व त्याचे होणारे दुष्परिणाम यावर मुंबरकर यांनी बहुमोल असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख वक्त्या मुंबरकर यांचे प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी स्वागत केले. तसेच त्यांच्या या अभिनव उपक्रमा बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे व सर्व संचालक मंडळ यांनी विशेष आभार व्यक्त केले.