*कोंकण Express*
*करंजे-बौद्धवाडीतील इसमाची गळफासाने आत्महत्या*
*कणकवली : प्रतिनिधी*
पत्नी सोबत राहत नाही म्हणून नैराश्येपोटी करंजे -बौद्धवाडीतील मंगेश नारायण कदम (वय-५०) यांनी घराच्या छप्पराच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.मंगेश कदम याला दारूचे व्यसन होते म्हणून पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती.
मंगेश कदम यांचे वाडीतील विजय शंकर कदम याच्याकडे येणे-जाणे होते. परंतु ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत ते कुठे दिसले नाही म्हणून विजय कदम याने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता घरात फासाला लटकताना दिसला.७ ते ९ डिसेंबर या कालावधीत त्यानी आत्महत्या केल्याचे फिर्यादित विजय कदम यांनी म्हटले आहे.