*कोंकण Express*
*तिरवडे गावाच्या श्री माऊली देवीचा १२ डिसेंबरला वार्षिक जत्रौत्सव*
*मालवण : प्रतिनिधी*
नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणुन ख्याती असलेल्या तिरवडे गावाच्या श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार १२ डिसेंबर रोजी साजरा होत.या दिवशी दुपारनंतर ओटी भरण्याच्या कार्यक्रमास सुरवात होणार. रात्री ११ वाजता नयनरम्य आसा पालखी सोहळा होतो.त्यानंतर रात्री एक वाजता खानोलकर दशावतारी नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
जत्रौत्सवात भाविक तसेच माहेरवाशीन माता भगिनींची ओटी भरणे साठी मोठी गर्दी करतात.तरी दशक्रोशी व सर्व ठिकाणच्या देवीच्या भक्तानी सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख मानकरी व बारा पाच यांचे कडुन करण्यात आले आहे.

