*कोंकण Express*
*राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत आरपीडीची स्वरांगी खानोलकर प्रथम*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कलाउत्सव राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या स्वरांगी संदीप खानोलकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिची भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत,उपाध्यक्ष डॉ.दिनेश नागवेकर,सचिव व्ही.बी.नाईक,खजिनदार सी. एल. नाईक,शाळा समितीचे अध्यक्ष अमोल सावंत तसेच मुख्याध्यापक जगदीश धोंड,उपमुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक संजय पाटील,उपप्राचार्य डॉ.सुमेधा नाईक तसेच पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,पालक शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.