*कोंकण Express*
*बांग्लादेश मधील हिंदू धर्मीय लोकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात हिंदू बांधव एकवटले*
*मूक मोर्चात आम.दीपक केसरकर,आम.नितेश राणे,आम.निलेश राणे व हजारो हिंदू बांधव सहभागी*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू व बौद्ध समाजातील नागरिकांवर हल्ल्याच्या व अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक,ओरोस सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
यावेळी आमदार दीपक केसरकर,आमदार नितेश राणे, आमदार निलेश राणे, युवराज लखमराजे भोसले, दत्ता सामंत, काका कुडाळकर, आणि सकल हिंदू बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.मोठ्या संख्येने सकल हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते उपस्थित होते.