अखेर जलतरण स्पर्धेतील प्रवेश शुल्कात सवलत मिळाली

अखेर जलतरण स्पर्धेतील प्रवेश शुल्कात सवलत मिळाली

*कोंकण Express*

*अखेर जलतरण स्पर्धेतील प्रवेश शुल्कात सवलत मिळाली*

*बाबा मोंडकर यांनी वेधले होते लक्ष*

*मालवण : प्रतिनिधी*

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्थानिक खेळाडूंना प्रवेश फीमध्ये सूट देण्याची मागणी मालवण शहर भाजपच्यावतीने आयोजक संस्थेकडे करण्यात आली होती.संस्थेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांचे याकडे निवेदन देऊन भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी लक्ष वेधले होते.दरम्यान,श्री.परब यांनी स्थानिक खेळाडूंची मागणी लक्षात घेत प्रवेश फीमध्ये पन्नास टक्के सूट देण्याचे जाहीर केले.यामुळे स्थानिक खेळाडूंनाही आता या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

भाजप,मालवणच्या वतीने बाबा मोंडकर यांनी याबाबतचे निवेदन जलतरण संस्था सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष बाबा परब यांना दिले.संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी चिवला बीच येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धा भरविण्यात येत असून महाराष्ट्र राज्यातील तसेव अन्य राज्यातून स्पर्धक यामध्ये सहभागी होत असतात.तसेच ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेक संस्था प्रतिनिधी,पर्यटक ही सहभागी होतात. यामध्ये जिल्ह्यातील स्पर्धकही सहभागी होत असतात.

त्यामुळे जिल्ह्यातील सहभागी स्पर्धकांना स्पर्धा फीमध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून ७५ टक्के सवलत मिळावी.जेणेकरून जिल्ह्यातील स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या जलतरण स्पर्धेमध्ये भाग घेतील तसेच या माध्यमातून त्यांना पुढे जाण्याची संधी प्राप्त होईल, असे निवेदनात म्हटले होते.

यावेळी बाबा मोंडकर,ललित चव्हाण,पंकज सादये,कॅलीस फर्नांडिस आदी उपस्थित होते.स्थानिक जलतरणपटूंसाठी सतत मेहनत घेणारे प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांनीही मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते.भूमिपुत्रांसाठी कायमस्वरुपी धोरण ठरविण्यात यावे,अशीही मागणी केली होती.संस्थेचे उपाध्यक्ष बाबा परब यांनी तातडीने फीमध्ये सूट देण्याचे जाहीर केल्याने गवंडे यांनी केलेल्या मागणीलाही प्रतिसाद मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!