*कोंकण Express*
*जिल्ह्यातील सैनिक व त्याच्या नातेवाईकांना सन्मान द्या – अनिल पाटील*
*सशस्त्र सेना ध्वजनिधी कार्यक्रम केवळ शासकीय राहू नये असे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
जिल्ह्यातील सैनिक व त्यांच्या नातेवाईकांना शासकीय कार्यालयात चांगली वागणूक मिळावी या उद्देशाने त्यांची कामे वेळेत करून कृतज्ञता व्यक्त करावे.फक्त ध्वजनिधी संकलन करून शासकीय कार्यक्रम होताने तर त्यात सर्व नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाच्या जुन्या सभागृहात सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनाचा शुभारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, जिल्हा सैनिक कल्याण सहाय्यक अधिकारी उदय आईर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच माजी सैनिक, वीरमाता, विरपिता, विर पत्नी, त्यांची मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.