आजगाव सुपुत्र कलाशिक्षक राजेश आजगावकर यांना आंतरराष्ट्रीय वॉटर कलर महोत्सवात प्रथम क्रमांक

आजगाव सुपुत्र कलाशिक्षक राजेश आजगावकर यांना आंतरराष्ट्रीय वॉटर कलर महोत्सवात प्रथम क्रमांक

*कोंकण Express*

*आजगाव सुपुत्र कलाशिक्षक राजेश आजगावकर यांना आंतरराष्ट्रीय वॉटर कलर महोत्सवात प्रथम क्रमांक*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

दिल्ली येथे ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय वॉटर कलर महोत्सवात आजगावं गावचे सुपुत्र तथा नूतन माध्यमिक विद्यालय,इन्सुलीचे कलाशिक्षक श्री.राजेश आजगावकर यांनी आपल्या अनोख्या कलागुणांच्या जोरावर भव्य असे यश संपादन केले आहे. महोत्सवातील “On the Spot Competition” या प्रकारात त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून सिंधुदुर्गचे नाव मोठ्या दिमाखाने उजळवले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मूळ आजगाव येथील श्री आजगावकर हे सध्या इन्सुली येथे अध्यापनाचे कार्य करत असून त्यांच्या या कौतुकास्पद यशामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात मोलाची भर पडली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्याविकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष,सर्व पदाधिकारी,सदस्य, सल्लागार,शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी श्री.आजगावकर यांचे यावेळी भरभरून अभिनंदन केले.

श्री.राजेश आजगावकर यांच्या या असामान्य कलाविष्काराने आणि सर्जनशीलतेने सिंधुदुर्गचे, आजगाव चे तसेच विद्यालयाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.या International Watercolour Society” (IWS) अंतर्गत 2 nd OlympiArt Art Exhibition आणि Art compilation मध्ये ५५० चित्रकरांचा सहभाग होता.त्यातून राजेश आजगावकर यांच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!