*कोंकण Express*
*इंडिया ओपन नेमबाजी स्पर्धेत कृष्णा हुन्नरेला कांस्य पदक*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
नुकत्याच भोपाळ, मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या इंडिया ओपन नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर ०.२२ रायफल प्रकारात कृष्णा हुन्नरे याने उत्कृष्ठ कामगिरी करत ६०० पैकी ५८४ गुणांसह कांस्य पदक पटकविले.केवळ एका गुणाने त्याचे सुवर्ण पदक हुकले.यापूर्वी १० मीटर एअर रायफल प्रकारात खुशल संभाजी सावंत, १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अमेय तिळाजी जाधव,स्वामींसमर्थ संजय बगळे या सर्वांची निवड महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाज अतुल नाखरे व श्रिया अतुल नाखरे यांची निवड १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात गोवा राज्य संघातून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे साठी झाली आहे.
रायफल प्रकारातील सर्व इव्हेंट हे भोपाळ,मध्यप्रदेश येथे १५ ते ३१ डिसेंबर पर्यंत खेळविण्यात येतील तर पिस्तूल प्रकारातील इव्हेंट हे १३ ते ५ जानेवारी पर्यंत दिल्ली येथील डॉ.कर्णिसिंग शूटिंग रेंज वर आयोजित करण्यात येणार आहेत.सदरचे नेमबाज हे उपरकर शूटिंग रेंज वर सराव करत असून त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व नेमबाजांची सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.