*कोंकण Express*
*महाविद्यालयाची आठवण हाच अमूल्य ठेवा -श्री महेश सावंत*
*फोंडाघाट महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.महाविद्यालयाच्या प्रगती विषयी विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.व्यासपीठावर फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.महेश सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉ. राजाराम पाटील यांनी या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.नॅकची माहिती दिली.महाविद्यालयाच्या जडणघडनीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान सांगितले.आपल्या प्रगतशील जीवनात महाविद्यालयाचे असलेले योगदान विद्यार्थ्यांनी सांगितले पाहिजेत.त्याची आठवण ठेवली पाहिजे.आपले व्यावसायिक अनुभवाचा महाविद्यालयाच्या माध्यमातून आजी विद्यार्थ्यांना उपयोग कसा होईल याचा विचार केला पाहिजे.
मा.चेअरमन श्री.महेश सावंत म्हणाले की माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत सहभाग घेतला पाहिजे.ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले त्यांनी महाविद्यालयाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजेत.महाविद्यालय त्या सूचनांचा नक्कीच विचार करेल. आजी विद्यार्थ्यांच्या प्रगतीत त्यांची शाबासकीची थाप असली पाहिजे असे प्रतिपादन केले.
मेळाव्यात काही माजी विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सायली शिंदे, दिपाली जाधव, संजीवनी भालेकर, रसिका पांचाळ, शुभम जोशी, विशाल पारकर, वैभव टक्के यांचा समावेश होता.
प्राचार्य डॉ.पुरंधर नारे म्हणाले की माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाशी संपर्क वाढला पाहिजे.त्याच दृष्टीने हा प्रयत्न असतो.आपण सर्व आलात यातच महाविद्यालयाबद्दलची आपुलकी लक्षात येते.नॅक समिती ही त्याच दृष्टीने आपल्याकडे पाहणार आहे.यासंदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे.त्यातील तज्ञ काही प्रश्न विचारतील. आपण विद्यार्थी असताना आपल्याला महाविद्यालयाकडून मिळालेल्या सोयी सुविधा व विद्यार्थीदशा संपल्यानंतर आवश्यक असणारे महाविद्यालयाचे सहकार्य तुमच्या शब्दात तुम्ही नॅक समितीला सांगावयाचे आहे.त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षणामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल हा ही न्याय समितीला कळणे अपेक्षित आहे.त्यामुळे महाविद्यालया प्रती तुमची जबाबदारी वाढते. उच्च शिक्षणाबाबत आपली मते सजग असली पाहिजेत.अगदी कमी शब्दात आपली मते मांडली पाहिजेत असे प्रतिपादन केले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. राजाराम पाटील यांनी केले तर आभार प्रा.जगदीश राणे यांनी मांडले.प्रसंगी महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.