*कोंकण Express*
*सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने ९ डिसेंबरला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
येथील पत्रकार संघाच्या वतीने ९ डिसेंबरला आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी साडेआठ वाजता येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर यांनी केले आहे.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, अण्णा केसरकर, संतोष सावंत, प्रवीण मांजरेकर, तसेच नवयुग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उदय भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश चौगुले, स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर शेवाळे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.