*कोकण Express*
*खारेपाटण येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी*
आज खारेपाटण येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम ५ शालेय शिवकन्यांच्या हस्ते खारेपाटण एस.टी. स्टँड येथे शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विजय देसाई, रफिक नाईक, संदेश धुमाळे, सुकांत वरूणकर इत्यादींसह खारेपाटण कॉलेजचे प्रिन्सिपॉल कांबळे सर, सह शिक्षक शिंदे सर सोबत NSS विभाग प्रमुख सय्यद सर व NSS चे विद्यार्थी व खारेपाटण ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर एस.टी. स्टँड ते बाजारपेठ मार्गे खारेपाटण किल्ला अशी रॅली काढण्यात आली. खारेपाटण किल्ल्यावर जाऊन दुर्गादेवी मंदिरात श्रीफळ अर्पण करून बुरुजावर भगवे ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी निशिकांत शिंदे यांच्यातर्फे कांदेपोहे- अल्पोपहार देण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटणचे मंगेश गुरव, ऋषिकेश जाधव, निशिकांत शिंदे, प्राजल कुबल, सुधीर कुबल, गजानन राऊत, सिद्धेश सावंत, अक्षय चिके, संतोष रोडी, तुषार कोळसुलकर इत्यादी शिवप्रेमी तरुणांनी केले. सदर कार्यक्रमावेळी खारेपाटण किल्ल्याच्या संवर्धनासाठी सगळ्यांनी निधी संकलन करण्याची व येत्या काळात लवकरात लवकर किल्ल्याचे पुनर्जीवन करण्याची शपथ घेण्यात आली.