शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!*

शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!*

*कोंकण Express*

*शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!*

*यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी !*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण अत्यावश्यक आहे. वाडिया रुग्णालयाने रुपये दहा लाख इतक्या अंदाजित खर्चाचे पत्रक दिल्याने गौरांगच्या पालकांनी त्यासाठी आर्थिक ताकद उभी करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे समाजातील संवेदनशील व्यक्तींना काल साद घातली होती.

सोशल मिडिया वरचे प्रभाकर परब नामक गौरांग करिता प्रयत्न करीत असलेल्या व्यक्तीचे आवाहन भाजप वैद्यकीय आघाडी चे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक डॉ अमेय देसाई यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाजप चे विधानपरिषद आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्यासोबत संपर्क साधत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी यात लक्ष घातले तर गौरांग ला जीवदान मिळू शकेल ही बाब निदर्शनात आणली.

लागलेच त्यासंबंधीचे विनंती पत्र मुख्यमंत्री महोदयांना आज देण्यात येऊन आज त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या नवनिर्वाचित पण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

एकार्थाने संवेदनशील लोकप्रतिनिधी आणि राज्याचे प्रमुख असले की सामान्य माणसाच्या आयुष्यात गुणात्मक परिवर्तन कसे घडू शकते याचा परिपाठच आमदार भारतीय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी घालून दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!