*कोंकण Express*
*संदीप गावडे फाउंडेशनच्या वतीने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचे आयोजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
स्पर्धा परीक्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतपत यशस्वी झालेली आहेत. अनेक विद्यार्थी गुणवत्ता असून देखील अपुऱ्या मार्गदर्शनामुळे नेहमीच मागे पडतात. महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या निकालामध्ये कोकण विभाग कायमच नंबर एक असतो.
अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी इयत्ता चौथी पासूनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा इयत्ता चौथीसाठी असून त्यानंतर पुढील इयत्ता प्रमाणे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची शोध प्रक्रिया देखील राबवली जाईल. या परीक्षेसाठी तालुक्यातील इयत्ता चौथीतील प्रत्येक विद्यार्थ्याने सहभागी होण्याचे आवाहन संदीप गावडे फाउंडेशन चे अध्यक्ष सुधीर गावडे व सचिव दत्ताराम सावंत यांनी केले आहे. या स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे असतील.
१) परीक्षा नोंदणीसाठी केवळ स्वागत मूल्य आकारले जाईल.
(१००/-परीक्षा शुल्क)
२) विशेष टॉप ५ विद्यार्थ्यांना सायकल स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.
या व्यतिरिक्त इतर गुणवंत विद्यार्थ्यांनाआकर्षक बक्षीस योजना खालील प्रमाणेआहेत.
१) पहिल्या ५० विद्यार्थ्यांना ५० सुवर्णपदक व भेटवस्तू
२) पुढील ५० विद्यार्थ्यांना५० रौप्य पदक, व भेटवस्तू
३) यापुढील पन्नास विद्यार्थ्यांना ५० कांस्य पदक व भेटवस्तू. तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ राहील तर परीक्षेची संभाव्य तारीख रविवार ९ मार्च २०२५ राहील.यामध्ये काही बदल असल्यास अगोदर कळवले जाईल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ९४२०७३५२८५ संपर्क साधावा.

