*कोंकण Express*
*आयुष्मान भारत आरोग्य मंदिर बांदा नं.१ मध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहीम चे उद्घाटन*
*बांदा : प्रतिनिधी*
आयुष्मान भारत आरोग्य मंदिर बांदा नं.१ मध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहीम चे दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यांनी क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी तसेच जागरूक रहाण्याबद्दल शपथ घेण्यात आली.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरती देसाई, आरोग्य सेवक दिपेश मेजारी, आरोग्य सेविका अनुज्ञा नाईक, आशा स्वयंसेविका सुधा बांदेकर, सावली कामत, राजश्री आळवे, अंक्षकालीन स्त्री परिचर वनिता धुरी आणि बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण उपस्थित होते. यावेळी उपस्थित रुग व ग्रामस्थांना क्षयरोगाविषयी विस्तृत आरोग्य शिक्षण देण्यात आले. टिबी हरेल देश जिंकेल असे घोषवाक्य देण्यात आले.

