*कोंकण Express*
*आ.नितेश राणेंच्या पक्षाचा पदाधिकारी कत्तलीला जाणाऱ्या गाईंच्या आरोपींचे वकीलपत्र घेतो हे त्यांना चालते का ? – सुशांत नाईक*
*कणकवली : प्रतिनिधी*
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेकपोस्टवर अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. सदर गुरे वाहून नेणारा ट्रक हा गुरांची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याच्या बातमीने सर्वत्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या ट्रक मध्ये गावठी गायी व वासरे अशी मिळून सुमारे 19 पाळीव जनावरे आढळून आली. त्या ट्रक चालक व संबधित आरोपींवर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई नंतर हिंदूंचे गब्बर समजणारे आमदार नितेश राणे यांचाच भाजप वकील सेलचा एक पदाधिकारी अॅड. परुळेकर यांनी त्या गोमाता कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या आरोपीचे वकील पत्र घेतो. याच्यावरून नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचे धडे शिकवले नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होतो. आपल्या सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर करणारे आमदार यांचे खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे दात वेगळे आहेत. हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी वरचे वर हिंदुत्वाचा वापर करतात.
एका ठिकाणी हिंदू न्याय यात्रा काढायची व दुसरीकडे आपल्याच भाजप पक्षाचा पदाधिकारी आपल्या गोमातेंचे कत्तल करणाऱ्या आरोपीचे वकील पत्र घेतो. आपल्याच पक्षाच्या कार्यकत्यनि असे हिंदुत्वाच्या पलीकडे गेलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे काय असा प्रश्न देखील जनतेतून उपस्थित केला जात आहे. असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे.