*कोंकण Express*
*प्रफुल्ल सुद्रिक यांच्याकडून अजित पवारांना शुभेच्छा*
*कुडाळ : प्रतिनिधी*
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावाची महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी घोषणा झाल्याबद्दल सिंधुदुर्ग राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सुद्रिक यांनी मुंबई-देवगिरी येथे निवासस्थानी पवार यांची भेट घेतली.
यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रांतिक सदस्य डॉ. अभिनंदन मालंडकर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष हार्दिक शिंगले, माजी तालुकाध्यक्ष मकरंद परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष हर्षद बेग, सुनील हरमलकर, व्हिक्टर फर्नाडिस, अरुण मलानकर आदी उपस्थित होते.
मुंबई उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांचे नाव जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी अभिनंदन केले.