*कोकण Express*
*कणकवलीत नगराध्यक्ष नलावडे यांनी शिवजयंतीनिमित्त शिवपुतळ्याला केले अभिवादन..*
कणकवली शहरात ठिकठिकाणी शिवजयंती शासकीय नियम पाळत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळा व शिवाजीनगर येथील शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी स्थानिक कमिटी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन नगराध्यक्ष नलावडे यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजीनगर येथील छत्रपतींच्या पुतळ्याला नगराध्यक्ष नलावडे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवप्रेमींकडून शिवजयघोष करण्यात आला.