*कोंकण Express*
*लेक लाडकी योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा; शिवसेना कणकवली महिला तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर*
*कणकवली : प्रतिनिधी*
लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणार मुलींना एक लाख रुपये, मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे. मुलींचा जन्मदर वाढावा. तिच्या शिक्षणास चालना मिळावी. बालविवाह थांबावे, मुलींचे कुपोषण थांबावे आदींचा विचार करता, सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली असल्याची माहिती शिवसेना कणकवली महिला तालुकाप्रमूख प्रिया टेंबकर यांनी केले आहे.
लेक लाडकी योजनेचा अर्ज कसा करायचा १) पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक २) कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये,३) इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, ४) इयत्ता सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ५) बारावीत गेल्यावर आठ हजार रुपये,६) 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या एक अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा किंवा 1 मुलगी असल्यास मुलगीला या योजनेचा लाभ मिळेल.
लागणारी आवश्यक कागदपत्र खालीलप्रमाणे, जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थ्याचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स पहिल्या पानाची प्रत, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र आदी. कुटुंबप्रमुख सरकारी नोकर इतर पेन्शनधारक नसावेत याची नोंद घ्यावी.