*कोंकण Express*
*आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होणार*
*मुंबई : प्रतिनिधी*
महायुतीच्या माध्यमातून आज मुंबईत होणाऱ्या शपथविधी मध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तिघेजण शपथ घेणार आहेत तर उर्वरित मंत्र्यांचा ११ तारखेला शपथविधी होणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असलेल्या आमदारांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदा समवेत अर्थमंत्रीपद देण्यात येणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.
आज मुंबई येथे महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे.या शपथविधी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह अन्य काही मंत्र्यांची शपथविधी होण्याची शक्यता होती.परंतु मिळालेल्या माहितीनुसार आज फक्त मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी ११ तारखेनंतर होणारा असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या सर्व धामणीत मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या इच्छुक मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.