*कोंकण Express*
*१९ वर्षाखालील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ विजेता*
*अंतिम सामन्यात पालघर संघ उपविजेता*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणिटेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक येथे ४ थी १९ वर्षाखालील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धा पार पडली. सिंधुदुर्ग संघासोबत स्पर्धेचा अंतिम सामना पालघर संघाशी झाला. शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत दणदणीत विजय मिळवत सिंधुदुर्ग संघ प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला.
हे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचा संघ सहभागी झाला होता. याकरीता टेनिस क्रिकेट असोसिएशन सिंधुदुर्ग कडून जिल्हास्तरीय निवड चाचणी एमआयडीसी मैदान ग्राउंड, कुडाळ येथे घेण्यात आली होती. त्या निवड चाचणी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुलांचा संघ तयार करण्यात आला. हा संघ स्पर्धेला उतरला होता.
सिंधुदुर्ग संघाने गटातील पहिले दोन सामने धाराशिव व नाशिक संघाबरोबर जिंकले त्यानंतर तिसरा सामना सातारा संघाबरोबर गमावला व दुसऱ्या स्थानावर राहून बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर जालना व पालघर अ संघाला हरवून सिंधुदुर्ग संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. तिथे रत्नागिरी संघावर मात करून अंतिम सामन्यामध्ये धडक मारली.
स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग संघाचा खेळाडू निनाद सातोस्कर याला दोन सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाले तसेच रामकृष्ण शिरसाट याला दोन सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाले व यश कावळे याला दोन सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व्यंकटेश आडारकर उत्कृष्ट फलंदाज व यश कावळे याला उत्कृष्ठ गोलंदाज ठरले.सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला त्यामुळे संघ अंतिम सामन्यांमध्ये पोहचला.सिंधुदूर्ग संघ प्रशिक्षक कुणाल हळदणकर,राहुल धुरी,भुषण गावकर व अभिषेक गुंड्ये यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी खेळाडूंचे टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम, सहसचिव चंद्रकांत तोरणे,खजिनदार घनश्याम सानप, धनश्री गिरी मॅडम,संदीप पाटील,महेश मिश्रा,सिद्धेश गुरव,सुमित अनेराव यांनी अभिनंदन केले.