*कोंकण Express*
*सावंतवाडीचे सुपुत्र राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होण्याचे संकेत*
*मुंबई : प्रतिनिधी*
सावंतवाडीचे सुपुत्र असलेले राहुल नार्वेकर यांच्याकडे पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा ९ तारखेला होणार असल्याचे समजते. याबाबत अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस उद्या शपथ घेणार आहेत. त्यांच्यासमवेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे ही शपथ घेण्याची शक्यता आहे. आज तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेऊन शपथविधीचा दावा केला.
यावेळी भाजपकडून विधानसभा अध्यक्ष पदाची पुन्हा एकदा माळ नार्वेकर यांच्या गळ्यात घातली जाण्याची शक्यता आहे. नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ते सावंतवाडीचे सुपुत्र आहेत. गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या काळात त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी पार पडली होती.या पाचव्या नव्या सरकारची शपथविधी झाल्यानंतर ७ ते ९ डिसेंबरला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर ९ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे.