नवनवीन दृष्टिकोन व जिज्ञासा यातून आदर्श व्यक्तिमत्त्व निर्माण करा – दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत

नवनवीन दृष्टिकोन व जिज्ञासा यातून आदर्श व्यक्तिमत्त्व निर्माण करा – दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत

*कोंकण Express*

*नवनवीन दृष्टिकोन व जिज्ञासा यातून आदर्श व्यक्तिमत्त्व निर्माण करा – दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत*

*आयीत ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संबंध हा नेहमी वैज्ञानिक असावा लागतो.आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी समुद्रावर आरमार उभारून परकियांना चितपट केले होते.हा त्यांचा त्याकाळचा वैज्ञानिक दृष्टिकोनच होता.त्यांच्या या दृष्टिकोनामुळे संपूर्ण जगाला नाविक दल प्राप्त झाले आहे.विद्यार्थ्यांनीही अशाप्रकारे नवनवीन करण्याचा दृष्टीकोन,आपल्यात सतत एक वेगळी जिज्ञासा ठेवावी.त्यानेच आपला संपूर्ण विकास व आदर्श व्यक्तिमत्व घडण्यास मदत होईल,असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि दोडामार्ग पंचायत समिती आयोजित ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.यंदा हे विज्ञान प्रदर्शन श्री नव माध्यमिक विद्यालय आयी या प्रशालेत ठेवण्यात आले होते.शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर जवळपास ७१ प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, वेदांत कंपनीच्या सीएसआर ऑफिसर वैभवी कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयीच्या मुख्याध्यापिका उज्वला पर्येकर, आयी सरपंच तुषार नाईक, गट समन्वयक गुरुदास कुबल, तळेखोल सरपंच वंदना सावंत, सूर्यकांत नाईक, नंदकिशोर म्हापसेकर, महेश काळे, राजलक्ष्मी लोंढे, रामचंद्र ठाकूर यांसह अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले.

यावेळी अजिंक्य सावंत म्हणाले, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण लागले की आपण त्यांचे पालन करतो. मात्र त्यांचे पालन करण्यामागे नक्की कोणते वैज्ञानिक दृष्टीकोन आहे हे सुध्दा आपण मुलांना सांगणे गरजेचे आहे. शिक्षकांमध्ये जर वैज्ञानिक दृष्टीकोन असेल तरच तो विद्यार्थ्यांमध्ये उतरू शकतो. त्यामुळे शिक्षकांनीही आपल्यात वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या काय लपले आहे याकडे लक्ष द्यावा व त्या पद्धतीने प्रयत्न करावेत. शिवाय वेळेला अधिक महत्त्व द्यावे अन्यथा वेळ तुम्हाला वेळ आल्यावर महत्त्व देणार नाही असेही म्हणाले.

पुढील पिढ्यांसाठी निसर्गाचे रक्षण करावे वैभवी कुलकर्णी विज्ञानाचे आपल्या जीवनात खूप मोठे महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात विज्ञानाची कास धरावी. त्याशिवाय आपण ज्यापमाणे शाश्रत वस्तंचा निसर्गातील घटकांचा वापर आपल्या रोजच्या जीवनात करत आहोत त्याप्रमाणे आपल्या येणाऱ्या पुढील अनेक पिढ्यांना तो करता यावा यासाठी प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे वेदांत सेसा कोकच्या सीएसआर ऑफिसर वैभवी कुलकर्णी यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांची पाहणी करून कौतुक केले. तसेच प्रकल्पांची माहिती करून घेतली. सदर प्रदर्शन गुरुवार ५ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. ऊद्या दुपारी पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!