७ कॅबिनेट मंत्रीपदं, २ राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्…; अजित पवार मागणार ?

७ कॅबिनेट मंत्रीपदं, २ राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्…; अजित पवार मागणार ?

*कोंकण Express*

*७ कॅबिनेट मंत्रीपदं, २ राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्…; अजित पवार मागणार ?*

*मुंबई : प्रतिनिधी*

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर, आता सर्वांचे लक्ष लागले आहे, ते खातेवाटप आणि नव्या सरकारच्या शपथविधीकडे. राज्यातील महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी गुरुवार,५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.

या सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. यातच आता, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत अजित पवार ११ पदे मागण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात वृत्तानुसार, अजित पवार, महाराष्ट्रात ७ कॅबिनेट आणि दोन राज्य मंत्री पदे, केंद्रात एक कॅबिनेट आणि कुठळ्याही एखाद्या राज्यात राज्यपाल पदाची मागणी करू शकतात. पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पद आणि प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात कॅबिनेट पद मिळावे, अशी अजित पवार यांची इच्छा आहे.
राज्यात ५ डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यापासून ते दिल्लीपर्यंत राजकीय हालचाली बघायला मिळत आहेत.

अजित पवार सोमवारपासूनच दिल्लीत आहेत. ते अमित शाह यांचीही भेट गेण्याची शक्यता आहे. यापूर्वी, महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत एक बैठकही झाली आहे.माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषद अध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२ , शिवसेनेला ५७ तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!