विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे श्री.अरुण इंगळे महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे श्री.अरुण इंगळे महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित

*कोंकण Express*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे श्री.अरुण इंगळे महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री अरुण इंगळे यांना अकोला जिल्ह्यातील आगर विद्यालयाने महात्मा फुले हा मानाचा पुरस्कार देवून सन्मानित केले.अरुण इंगळे हे प्रामाणिक व कष्टाळू कर्मचारी म्हणून कणकवली शहर व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अथक कष्टाला महात्मा फुले पुरस्काराने मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

कणकवली ते अकोला जिल्ह्यातील आगर गावापर्यंत अरुण इंगळेचे कष्टाचे पाझर दरवळत गेले आणि आयुष्याचे चिज झाले.अरुण इंगळेचे कष्ट आणि कामावरची निष्ठा विद्यामंदिरच्या प्रत्येक घटकात चराचर भरून वहात आहे शाळेवर अतोनात प्रेम आणि विद्यार्थ्यीवर ममता असल्यामुळे अरुण सतत कामात गढून गेला आहे.आतापर्यंत त्यांना विविध संस्थांचे चौसष्ट पुरस्कार बहाल झालेले आहेत.साधी रहाणी आणि कुटुंब वात्सल्य असलेले इंगळे यांच्या पुरस्काराने विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पीजे कांबळे सर यांनी त्यांचा आदराने प्रशालेत सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समवेत सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी पर्यवेक्षिका वृषाली जाधव मॅडम व जेष्ठ शिक्षक अच्यूतराव वणवे सरांनी ही अभिनंदन केले सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!