*कोकण Express*
*1 मे रोजी सावंतवाडीत कंटनेर थिअटरचा उद्घाटन सोहळा*
*ठरल्या जागीच होणार कंटेनर थिअटर_ संजू परब*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी नगरध्यक्ष पोटनिवडणुकीत सावंतवाडीकरांना कंटेनर थिएटरचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आमदार नितेश राणे यांनी पूर्ण केले असून, हे थिएटर ज्या ठिकाणी ठरले होते त्याच ठिकाणी होणार आहे.
या ठरावाला सर्वांनी मंजुरी दिली आहे. या थिएटर चे उद्घाटन १ मे रोजी होणार असून, पहिला चित्रपट सावंतवाडी कराना पाहता येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. या एकी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.