*कोंकण Express*
*युतीच्या सरकारच्या काळात मोठे प्रकल्प कोकणात येऊदे – मा.आम.प्रमोद जठार यांचं अनभवानी मातेच्या चरणी साकडे*
*कणकवली : प्रतिनिधी*
डामरे गावचे ग्रामदैवत गांगो अनभवानी मातेच्या यात्रोत्सवाला माजी आमदार प्रमोद जठार यांनी भेट देऊन मातेचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जठार साहेबांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे , प्रांताधिकारी जगदीश काटकर ,तहसीलदार चैताली सावंत वैभववाडी तहसीलदार तसेच गावातील बारा पाचाचे मानकरी भाविक उपस्थित होते .
जठार यांनी यावेळी मातेकडे कोकण समृद्ध होऊ देत कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार येऊ देत युतीच्या सरकारच्या काळात मोठे प्रकल्प कोकणात येऊन येथील युवक इथेच व्यवसायामध्ये उद्योगपती होऊ देत अशी प्रार्थना केली.