जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री डॉ.सौ.सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार २०२५ जाहिर

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री डॉ.सौ.सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार २०२५ जाहिर

*कोंकण Express*

*जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री डॉ.सौ.सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार २०२५ जाहिर*

*४ जानेवारी ला मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान*

*कणकवली : प्रतिनिधी*

आयुष्यभर रस्त्यावरील निराधार आणि वंचित असलेले वयोवृध्द, मनोरूग्ण असलेल्या बांधवांच्या शारिरीक आणि मानसिक वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार २०२५ जाहिर झाला आहे. आगामी पुढिल वर्षात ४ जानेवारी २०२५ रोजी संदिप परब यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे.

संदिप परब (वय ५१) यांनी त्यांचे आजवरचे सारे आयुष्य रस्त्यावरील निराधार वंचितांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळण्यासाठी व्यतीत केले. मुंबईतील माणसांच्या गर्दीत रस्त्याकडेला निराधार आणि वंचित अवस्थेत कोणत्याही उपचारांविणा दिनवाने पडलेले निराधार, वयोवृध्द जखमी, मनोरूग्ण बांधव पाहून संदिप परब या युवकाचे मन अस्वस्थ झाले. आणि या अस्वस्थतेतच त्यांनी हाती कोणतीही संसाधने नसताना सांताक्रुज मुंबई येथील वाकोला ब्रीजखालून जख्मी निराधार बांधवांवर प्रथमोपचार सेवा कार्य सुरू केले. या सर्व कार्याला जनतेचा पाठिंबा मिळाला. त्यातून जीवन आनंद संस्थेचे मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग सह गोव्यातील आश्रमांचे सेवा कार्य उभे राहिले. आज या सर्व आश्रमांतून शेकडो निराधार बांधवांची सेवा सुश्रुषा संदिप यांचे तरूण सहकारी करीत आहेत. या पुरस्कारामधे एकावन्न हजार रूपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ चा समावेश आहे.

संदिप परब यांना पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाल्यामुळे जीवन आनंद संस्थेच्या सेवा कार्यकर्त्यांची टिम आश्रमांतील बांधव आणि हितचिंतक मंडळींमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!